105 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
मार्डी दि. ०७/१०/२४
श्रीक्षेत्र मार्डी ग्रामदैवत श्री नागनाथ यात्रे निमित्त गेल्या चार वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे श्री गुरु नागनाथ यात्रा प्रारंभ होऊन आज चा हा पाचवा दिवस आहे.श्री नागनाथांमुळे वैराग्य पीठाचा – वारसा मार्डी गावाला लाभला व आई यमाई देवी मुळे शक्ती पिठाचा वारसा मार्डी गावास लाभला तर श्री नागनाथाच्या आद्य भक्त सौ. बातकव्वा मुडके – यांच्या वास्तव्याने भक्तीपीठाचा वारसा हा मार्डी गावास लाभला .श्री नागनाथ – देवस्थानचे खर्गे नागेश स्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून गेल्या 4 वर्ष पासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
रक्तदान शिबिराच्या प्रारंभी श्री नागेश स्वामी यांच्या हस्ते नागनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित मान्यवर महाराजांचे बंधू मल्लिनाथ स्वामी संजय इनामदार.अरुण मुडके.महेश मुडके .श्रीकांत मार्तंडे .शरद पवार अविनाश गोंगाने सतीश मुडके.ओंकार राजपूत . पांडुरंग पवार. जगन्नाथ मुडके.सुदर्शन मुड के .गजु सुरवसे शुभम राजपूत स्वप्निल लंगोटे रोहित देशमुख सुनील खर्डे वैभव जोगी. गणेश सुतार .तसेच नागनाथ भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्याचबरोबर सिद्धेश्वर ब्लड बँकेचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या वतीने व श्री नागेश स्वामी महाराज यांच्या वतीने उपस्थित 105 रक्तदात्यांचे मानले आभार.