

माहिती व प्रसारण मंत्रालयाची अधिकृत घोषणा,गेल्या पाच वर्षांतील निःपक्ष व निर्भीड पत्रकारितेची दखल घेत ,राष्ट्रीय स्तरावर मराठी वृत्तपत्राचे स्थान मजबूत.
मराठी वृत्तपत्र जगतात ,निःपक्ष वृत्तसत्ता या प्रतिष्ठित मराठी दैनिकाला केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सत्य, निःपक्षता आणि नागरी हित समाज हितांच्या तत्त्वांवर ठाम राहिलेले संपादक निखील भोसले यांच्या नेतृत्वाला यामुळे राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
याच अनुषंगाने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले असता निखिल भोसले यांचा अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचा हस्ते सत्कार संपन्न झाला.
संपादक निखील भोसले,बोलताना म्हणाले “हा क्षण आमच्या वाचकांसाठी, आमच्या संघासाठी आणि मराठी पत्रकारितेसाठी अभिमानाचा आहे. मी नेहमी मानतो की वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आहे. न्यायालयाचा तिसरा डोळा म्हणून वृत्त पत्राकडे पहिले जाते. केंद्र सरकारच्या या मान्यतेमुळे आमच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या असल्याचं म्हणाले.