
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विजेत्या असणाऱ्या स्पर्धकास मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख स्वरूपाचे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रल्हाद काशिद, मार्डीचे माजी उपसरपंच युवराज पवार, कृ उ बाजार समिती सोलापूरचे माजी संचालक नामदेव गवळी, मंडळाचे उत्सव अध्यक्ष दिगंबर गोरे यांची उपस्थिती होती. 3 जून रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकार यांची सवाद्य लेझीम मिरवणूक यामध्ये भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे (भाऊ) पवार, कोषाध्यक्ष इंद्रजीत (भाऊ) पवार, काशिनाथ कदम, गणेश पवार, मंडळाचे अध्यक्ष शाम भोगे, बिरू गोरे, दीपक गिरे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यास किरण बनसोडे व रोहित नवगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.