या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी झालो, उपस्थितांना संबोधित केलं.
माया, ममता, प्रेम, वात्सल्याची करूणामूर्ती तसंच वेळप्रसंगी महाकालीचं दर्शन घडवणाऱ्या महिला भगिनींचं, मायमाऊलींचं राष्ट्रनिर्मितीत मोठं योगदान आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या स्त्रीशक्तीला मी वंदन करतो. आजपर्यंत अनेक सरकारं आली आणि गेली, परंतु सर्वाधिक लोकप्रिय योजना जर कुणी दिली असेल तर या सरकारनं, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेचा लाभ झालेल्या भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून फार समाधान वाटते. या आठवड्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे बहिणींच्या बँक खात्यात जमा होतील, हे मी जबाबदारीनं सांगतो.
आपलं राज्य एक प्रगतशील आणि आर्थिक बाबतीत सक्षम असं राज्य आहे. त्यामुळे कोणतीही योजना बंद पडणार नाही, याची खात्री बाळगा. माझी लाडकी बहीण योजनेसह मुलींना मोफत शिक्षण, वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत, शेतकऱ्यांना वीज बिल माफी, एक रुपयात पीक विमा, दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान इत्यादी सगळ्या योजना सुरूच राहतील. केवळ एक विनंती आहे ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम साथ द्या, जेणेकरून योजना पुढची पाच वर्षे सुरूच राहतील.