स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी टेंभूर्णी- पंढरपूर महामार्गावरील परीते पाटीवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक, १ लाखाचा मुद्देमाल जप्त.

संदीप जाधव, रा. जैनापूर, विजयपूरा हे त्यांच्या साथीदारासह चाकण, जि. पुणे येथे बकरीचा व्यापार करून पिक-अप वाहनातून विजयपूरकडे जात होते. दिनांक ०५.१०.२०२४ रोजी पहाटे टेंभूर्णी पोलीस ठाणेच्या हद्दीतून पंढरपूर
मार्गे जात असताना परीते पाटीवरील गतिरोधकजवळ आले असता पाठीमागून लाल रंगाचे प्लसर मोटार सायकलवरील अज्ञात चोरट्यांनी येवून कोयत्याने वार करून त्यांचेकडील रोख रक्कम, दोन मोबाईल असा एकूण २,५७,०००/- रूपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला होता. सदरबाबत टेंभूर्णी पोलीस ठाणेस गु.र.नं. ६२४/२०२४, भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०९ (६) हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.

सदरचा गुन्हा हा राष्ट्रीय महामार्गावर घडला असल्याने गुन्ह्याचे घटनास्थळास वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली होती. श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी श्री. रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक यांना व पथकास वेळोवेळी मार्गदर्शन करून व सुचना दिले होते. त्यावरून पोउपनि रविराज कांबळे यांनी टेंभूर्णी व अकलूज भागात पेट्रोलिंग करून व गोपनिय बातमीदार यांच्या
मार्फत आरोपींचा शोध घेत होते. त्यामध्ये अकलूज येथील बातमीदार यांचेकडून गुन्ह्याच्या दिवशी अकलूज येथील काही गुन्हेगार वृत्तीचे लोक ” स्कीम आली आहे ” असे म्हणून बाहेरगावी गेले असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोउपनि कांबळे व पथकाने अकलूज येथे तळ ठोकून जास्तीत जास्त माहिती गोळा केली तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे गुन्हा घडला त्या वेळी घटनास्थळावर वावरत असलेबाबत माहिती प्राप्त केली. त्यावरून आरोपींचा माग काढला असता ते आरोपी अकलूज बाजारतळ येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त केली. त्यावरून तेथे सापळा लावून एकूण ४ आरोपींना ताब्यात घेवून तपास करता त्यांचेकडून रोख रक्कम, गुन्ह्यात गेलेला मोबाईल व
वापरलेली मोटार सायकल असा सुमारे १,००,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना पुढील तपासकामी टेंभूर्णी पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. श्री. प्रितम
यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश निंबाळकर, पोनि, स्था. गु. शा.
यांचेसह पोउपनि रविराज कांबळे, सहा. फौजदार निलकंठ जाधवर, पोह/ प्रकाश कारटकर, विरेश कलशेट्टी, पोना धनराज गायकवाड, पोकॉ अजय वाघमारे, अन्वर आत्तार, राहूल दोरकर, हरीश थोरात, बाळरोज घाडगे, सुनिल
पवार यांनी पार पाडली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *