“सायबर”च्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या

चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी

साताऱ्यात रंगले शाहू इन्स्टिट्यूटचै स्नेहसंमेलन!

कोल्हापूर,दि:- कोल्हापूरच्या शाहू इन्स्टिट्यूट (सायबर )संस्थेच्या एमबीए केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन दिनांक ७,८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी सातारा कास पठार, हॉटेल निवांत रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी ३२ जण सहभागी झाले होते.

पहिले स्नेहसंमेलन ४० वर्षानंतर गतवर्षी २६ व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गगनबावडा येथे पार पडले.
यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी आपला आत्तापर्यंतचा जीवन प्रवास कथन केला व विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. तसेच बामणोली या पर्यटन स्थळी भेट देऊन, नौकाविहाराचा आनंद लुटला.
सातारा येथे स्थायिक झालेले श्री. मानसिंगराव चव्हाण यांनी विठ्ठल – रखुमाईची सुंदर मूर्ती, तसेच प्रसिद्ध वकील श्रीकांत केंजळे, व शिवाजी भोसले यांनी येथील प्रसिद्ध खाद्य पदार्थ भेट दिली.डिजिटल मिडिया चे अध्यक्ष श्री. राजा माने व श्री. सुर्यकांत पाटील यांचा त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानी आपल्या मनोगतात एकमेकांना अडचणीत सहकार्याचे आश्वासन तसेच आवाहन केले.
सदर स्नेहसंमेलनाचे आयोजनासाठी श्री.सुनील कुडतुरकर,श्री. श्रीकांत केंजळे, श्री. मानसिंगराव चव्हाण,श्री. शिवाजीराव भोसले व श्री. राजन जगदाळे यांनी परिश्रम घेतले.
श्री. सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर व श्री. बाबुभाई हुदली यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.हे स्नेहसंमेलन पार पडण्यासाठी ,निवांत रिसाॅर्टच्या व्यवस्थापनाचे पण सहकार्य लाभले.
सर्वांनी या आयोजना बाबत समाधान व्यक्त केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *