राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी मोहोळचे विकासात्मक विद्यमान आमदार यशवंत माने यांना २४७ मोहोळ(अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली.आज गुरुपुषामृत”दिनाच्या मुहूर्तावर यशवंत माने यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व आशीर्वादाने यशवंत माने यांनी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान,
युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड , माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ,महेश निकंबे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव , यांनी यशवंत माने यांचा सत्कार केला.मोहोळ मतदार संघात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होवू आणि मोहोळ मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा एकदा फडकवू असा विश्वास जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,किसन भाऊ जाधव,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी माणिक कांबळे , वसंत कांबळे ,महादेव राठोड ,पवन बरे यांची उपस्थिती होती…
Posted inराजकीय