यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे २ कोटी ३० लाख भगिनींना झाला आहे. त्याकरता महायुती सरकारनं १७ हजार २०० कोटी निधीची तरतूद केली आहे.
महाराष्ट्रातील माझ्या भगिनींना, मायमाऊलींना सबल आणि सक्षम करण्यासाठी महायुती सरकारनं योजना आणली. वर्षभरामध्ये ४६ हजार कोटी रुपये बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या खात्याची जबाबदारी अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे, याबद्दल त्यांचं कौतुक आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं असून जातीपातीत भेद करत नाही. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणाचा आपल्याला विकास करायचा आहे, त्या अनुषंगानं उपाययोजना केल्या जात आहेत. हे तुमचं-आमचं कामाचं सरकार आहे. आम्ही दिलेलं वचन पूर्ण करतो.
राज्य सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या तमाम शासकीय योजना पुढची पाच वर्षे सुरूच राहतील, परंतु याकरता एकच विनंती करतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम साथ द्या, पाठबळ द्या. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आव्हान केले.