मतदारांना सूचना पाठविण्याचे श्री दिलीप कावळे यांचे आवाहन
भाजपाचा विधानसभा जाहीरनामा आता ‘अंमलबजावणी आराखड्याच्या’ स्वरूपात
सोलापूरः महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहिरनाम्याची तयारी आता अतिम टप्प्यात आली असून पक्षाने त्याचे स्वरूप परंपरागत जाहिरनाम्याच्या दोन पाऊल पुढे आता अंमलबजावणी आराखडा’ करण्याचे निश्चित केले आहे या आराखड्यासाठी मतदारांनी विचिच मुद्याचाबत महाराष्ट्राच्या विकासाच्या आपल्या आकाक्षा सूचनांच्या स्वरूपात पक्षाकडे पाठवाव्यात असे आवाहन श्री दिलीप कांबळे यानी आज सोलापूर मध्ये एका पत्रकार परिषदेत केले
पतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारांनी केदात आणि राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर उल्लेखनीय यश मिळविले आहे परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने असतात संकल्प पत्र ही पुढची पायरी होती आता सत्तेवर पुन्हा येण्याच्या आत्मविश्वासातून आम्ही आमच्या संकल्पातून कश्या प्रकारे अमलात आणायचा आराखडा तयार करीत आहोत’ असे ही श्री कावळे यानी सांगितले
भाजपने 2024 च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 30 सदस्याची एक जाहीरनामा समिती नियुक्त केली असून श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यतिरिक्त या समितीत सर्वश्री डी विनय सहस्रबुद्धे, श्री माधव भांडारी, श्री उज्ज्वल निकम, डॉ. भारती पवार, श्री सुभाष देशमुख, श्रीमती माधवी नाईक, श्री दिलीप कांबळे, खा श्री धनंजय महाडिक, श्री संभाजी निलंगेकर, श्री धनंजय मंगरूळे, श्री केशव उपाध्ये, श्री अनिल सोले. श्री नरेंद्र पवार इत्यादीचा समावेश आहे सूचना पाठविण्यासाठी पक्षाने आपल्या वेबसाइटवर एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे मतदारांनी इ-मेल अथवा पत्र पाठवून आपल्या ठोस सूचना पाठवाव्यात असे आवाहन पक्षाने केले आहे
मुख्य समितीच्या अंतर्गत विविध विषयांसाठी एकूण 18 उप-समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत यात श्री उज्ज्वल निकम (कायदा-सु-व्यवस्था), श्री माधव भांडारी (मदत आणि पुनर्वसन) श्री पाशा पटेल (शेती आणि शेतकरी), खा श्रीमती स्मिता वाघ (महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण), श्री दिलीप कांबळे (सामाजिक न्याय), प्रा. श्री श्रीपाद ढेकणे (शिक्षण) आणि श्री लद्दाराम नागवानी (ज्येष्ठ नागरिक) इत्यादींचा समावेश आहे
राज्याच्या विविध भागातील विविध समाज घटकांच्या प्रतिनिधीबरोबर समक्ष चर्चा, ऑनलाइन पद्धतीने विचार-विमर्श बैठका आणि मान्यवरांचा सल्ला घेण्यासाठी वार्तालाप इत्यादी उपक्रम अमलात येत आहेत.
- Facebook link: https://www.facebook.com/BJPMHManifesto/
- Instagram link: https://www.instagram.com/bjpmhmanifesto/
- X (Formerly Twitter) link: https://x.com/BJPMH Manifesto
- Mail Id: visionformaharashtra@gmail.com
- WhatsApp: 9004617157