भारताने आज खूप मोठं दुर्मिळ रत्न हरपले…

भारताने आज खूप मोठं दुर्मिळ रत्न हरपले…

सर रतन टाटा.

नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

सुमित मुळगावकर पुणे जिल्ह्याचे ते खूप मोठे शिल्पकार आहेत त्यांनी रतन टाटा यांच्या सहकार्याने टाटा कंपनी पुण्यात स्थापन केली ज्या कामगारामुळे आज ही कंपनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थापन झाली मोठ्या प्रमाणात उत्पादन या ठिकाणी होत गेलं त्यांची एक आठवण म्हणून त्यांनी टाटा सुमो ही गाडी नावारूपाला आणली.याच कारण सुमित मुळगावकर यांची आठवण म्हणून त्यांनी सुमो हे नाव त्यांच्या प्रोडक्ट गाडीला दिले .पुणे शहर हे मोठ्या नावारूपाने प्रसिद्ध झाले टेल्को या कंपनीच्या नावाने.

टेल्को या कंपनीमुळे अनेक छोटे मोठे उद्योग धंदे हे पुण्यात आहेत पुण्या मध्ये असंख्य लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झाला .अनेक लोकांचे जीवनमान हे टाटा कंपनीवर अवलंबून होते टाटा कंपनीने पुण्यातील आजूबाजूच्या कंपनीतून जी आपल्याला लागणार प्रॉडक्ट आहे ते घेण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आज त्या ठिकाणी खूप मोठा रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि पुण्यातील अनेक खेड्यात त्यांनी उपक्रम राबवले अनेक शिक्षण संस्थाना त्यांनी मदत केली अनेक गाव त्या ठिकाणी दत्तक घेतली गेली त्या गावांचा खूप मोठ्या प्रमाणात विकास त्यांनी केला . मुल मुली दत्तक घेऊन त्यांनी त्या मुलांचे शिक्षण देखील मोफत केले आहेत.अनेक आरोग्य शिबिर त्यांनी केली. लोकांना मोफत दवाखान्याची देखील सोय त्यांनी केली आहे.मालक असून देखील त्यांनी मी मालक आहे आहे भूमिका कधीच घेतली नाही तर टाटा ही कंपनी ट्रस्ट च्या रुपात त्यांनी खूप मोठं योगदान ही दिल. टाटा चे अन्न पासून तर घरुप्योगी समान आणि मानवाच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्व काही लागणाऱ्या साहित्यांचा प्रॉडक्ट निर्मितीही त्यांनी केले चमच्या ताट वाटी यापासून खाद्यपदार्थ असतील घरुपयोगी प्रॉडक्ट सामान असतील यांच्या अनेक छोटे मोठे कंपनी आहेत या भारतामध्ये भारताबाहेर देखील आहेत.

टाटा ग्रुपचं पाहायला गेलं तर देशसेवेसाठी एक खूप मोठं महत्त्व खूप मोठं योगदान त्यांनी या देशाला या जगाला दाखवून दिलं खरा देशभक्त कशा पद्धतीने आपल्या देशासाठी काम करतो की त्यांनी या त्यांच्या जीवनशैलीतून दाखवून दिलं तरुण पोरांना युवक युवतींना एक खूप मोठं प्रेरणादायी व्यक्ती म्हणून ते आज आपल्यासमोर देखील राहणार आहेत कारण असंख्य कामगार व कुटुंबियाचे कालची की त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जीवनमानात घेतलेल्या कुणाला पाहायला मिळते कारण प्रत्येक कामगाराला त्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा असतील घराच्या सुविधा असतील यादेखील त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या कामगारांच्या मुलांचे शिक्षण हे चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी विद्यानिकेतन संस्था नेत्यांनी स्थापन केलेलं पाहायला मिळतं त्याच अनुषंगाने कामगारांच्या मुलांना देखील कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ही नोकरीच्या संधी त्यांनी दिल्या त्याच पद्धतीने अनेक खेडोपाड्यात त्यांनी स्वच्छता अभियान असेल आरोग्य अभियान स्वच्छ पाणी हे लोकांना मिळावे यासाठी त्यांनी गावोगावी या अनेक सुविधा राबवल्या त्याच पद्धतीने तेथील शाळेंना जी काही मदत लागणार आहे ती मदत ही त्यांनी त्या ठिकाणी केली जे हुशार विद्यार्थी आहेत गरजू विद्यार्थी आहेत त्यांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षण हे पूर्णपणे त्यांनी मोफत केलेला मला पाहायला मिळतो त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर त्यांनी 26/11 चा जो हल्ला झाला मुंबई बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला त्यामध्ये अनेक नागरिक हे मृत्यूमुखी पडले अनेक बाहेर जे ताज हॉटेलच्या बाहेर उद्योगधंदे करणारे छोटे मोठे व्यावसायिक होते ते मरण पावले त्यांनाही त्यांनी मनापासून मदत केले कुठलीही सरकारी मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतःहून त्यांना मदत जाहीर केली आणि ती मदत वेळेत त्यांच्या घरी पोहोचवली गेली. अशा अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत ज्यावेळेस हा मोठा हल्ला झाला त्यावेळेस त्यांना सुमो गाडीची मोठी ऑर्डर ही पाकिस्तान कडून आलेली होती त्यावेळेस त्यांनी ही पाकिस्तानची ऑर्डर पूर्णपणे नाकारली आणि मी ही तुमची ऑर्डर देऊ शकत नाही हा सवाल त्यांनी पाकिस्तान कारण जो माझ्या देशाचा दुश्मन तो माझाही दुश्मन अशा शब्दात त्यांनी खडे बोलू सुनावले आणि ज्या कंपन्या भारत सोडून बाहेर देशात आहेत त्या ठिकाणी त्यांचं कार्य हे जे आपल्या भारतात चालतं त्याच पद्धतीनं त्यांनी दुसऱ्या देशात ही त्यांचं अनमोल योगदान कार्य यशोगाथा ही त्याच पद्धतीने चालू ठेवले. टाटा ग्रुपचं जे ब्रॅण्डिंग आहे ते त्यांनी कधीही खराब होऊ दिलेले नाही भारतात ज्यावेळेस ते रस्त्यावरून जात होते त्यांच्यासमोर अपघात घडला त्यावेळेस टू व्हीलर गाडीवरील चौघ जण मृत्युमुखी पडले त्यावेळेस त्यांनी एक निर्णय घेतला की स्वस्तातली स्वस्त कार ही मी भारतातील लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उभी करणार आणि त्या पद्धतीने त्यांनी भारतामध्ये नॅनो कारचा प्रकल्प हा खूप मोठ्या प्रमाणात उभा केला पण त्याला काही गोष्टी अपवाद होत गेल्या आणि त्यात त्यांना नॅनो प्रोजेक्ट हा काही काळासाठी बंद करावा लागला. पण या भारतातील लोकांची शेतकऱ्यांची जी काळजी आहे त्यांच्या प्रति होती ती अजून देखील काही लोक ओळखू शकले नाहीत कारण हेच की समाजकार्य आणि मानवतेचा दृष्टिकोन हाच त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न होता कारण आज आपल्या देशातील असंख्य नागरिक हे एक्सीडेंट मध्ये मरण पावतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना टू व्हीलर च्या किमतीत फोर व्हीलर गाडी उपलब्ध होईल याच पद्धतीने त्यांचं हे पाऊल होतं आणि त्या प्रकल्पामधून जेवढी गुंतवणूक केली त्याचा तोटा एक खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांना सहन करावा लागला तरी त्यांनी कुठलेही गोष्टीची हार न मानता त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू ठेवलं याचा आणखी एक उदाहरण सांगायचं झालं तर टाटा ग्रुप समूहाचा अध्यक्ष ज्यावेळेस बदलायचा होता त्यावेळेस सायरस मिस्त्री यांना टाटा ग्रुपचे अध्यक्ष करण्यात आलं होतं पण त्यांच्या काही कामगाराबद्दलच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना त्या ठिकाणी त्यांची हकलपट्टी करण्यातही त्यांनी कुठलीही परवा न करता त्यांना अध्यक्षपदावरनं पाय उतारा केलं आणि कंपनीच्या हिताचा आणि कामगारांच्या हिताचा प्रश्न जो होता तो त्यांनी मार्गी लावून त्यांची खूप मोठी योगदानाची भूमिका ही त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले. ते ज्या वेळेस कुठल्याही प्लांटला किंवा त्यांच्या कुठल्याही कंपनीला भेट देत होते त्यावेळेस त्यांनी व्हीआयपी ची जी पद्धत आहे ती कधीही वापरली नाही मनसोक्त कामगारांशी संवाद साधणार कामगारांच्या समस्या जाणून घेणं अडचणी जाणून घेणं हे त्यांनी कधीही सोडलेलं नाही आणि ज्या ताटात कामगार जेवण करतात ज्या ठिकाणी कामगार जेवण करतात त्या ताटात आणि त्याच ठिकाणी कामगारांसोबत त्यांनी सातत्याने जेवण करण्याचा आनंदही त्या ठिकाणी घेतला यातूनच आपणाला पाहायला मिळते की त्यांचे विचार त्याचे राहणीमान हे कुठल्या पद्धतीने मानवता दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे अशा थोर महामानवाला कोटी कोटी प्रणाम.

रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील. रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेकओव्हर करुन व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांतही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची विचारधारा आणि परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते.

१९९१ मध्ये रतनजी टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेल्को (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच, टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. २०१२ मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते.

२००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *