भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे:काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे.

भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे:काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे.

रविवारी (20 ऑक्टोबर): भाजपने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली. यात 99 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु कायम घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने पहिल्याच यादीत राजकीय घराण्यातील अनेकांना स्थान दिलं आहे.
राजकारणातील घराणेशाहीला विरोध करणारं हे त्यांचं पहिलंच विधान नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी, अमित शहा, अशा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी वारंवार राजकारणातील घराणेशाहीला भाजप प्रोत्साहन देत नसल्याबाबत भूमिका मांडली आहे. परंतु महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत अशा अनेकांना पक्षाने संधी दिली आहे.

भाजपचे इचालकरंजी मतदारसंघातून आमदार प्रकाश आवळे यांचे ते पुत्र राहुल आवळे यांना उमेदवारी,प्रतिभा पाचपुते श्रीगोंदा चे भाजपचे जेष्ठ विद्यमान आमदार बबनराव पाचपुते त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी,पिंपरी चिंचवडचे दिगवंत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर,रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षक खडसे यांना तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा संधी,अमोल जावळे हे भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र यांनाही संधी,भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या चिरंजीव संतोष दानवे यांनाही पुन्हा संधी, तसेच भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनाही कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून संधी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेली माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या विजया चव्हाण यांना भोकर मधून संधी देण्यात आली त्याच पद्धतीने भाजपचे मुंबई शहर चे माजी मंत्री आणि आमदार अशी शेलार यांना तिसऱ्यांदा बांद्रामधून उमेदवारी देत त्यांचे बंधू विनोद शेलार यांनाही मालाड मधून उमेदवारी दिली.

भाजप कडून प्रथम राजकीय घराणे शाहीतील उमेदवारांना तिकीट ,भाजप ची घराणेशाही पुन्हा उघड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात हे वक्तव्य केलं होतं.यावर काँग्रेसनेही जाहीर टीका केली असून, “भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत,” असं प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *