खैरे कुणबी समाज भवनाचे रूप पूर्णपणे बदलणार!
9-10-2024 Reshimbagh, Nagpur
नागपूर येथे आज खैरे कुणबी समाज भवनाचे भूमिपूजन आमचे नेते, मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहून जमलेल्या बंधू आणि भगिनींशी संवाद साधला.
जवळपास 70 वर्षांनंतर खैरे कुणबी समाज भवनाचे रूप पूर्णपणे बदलणार असून एक चांगली वास्तू याठिकाणी तयार होत असल्याचा विशेष आनंद आहे. ₹5 कोटींच्या निधीतून हे समाज भवन उभारले जात आहे. आपले सरकार हे विविध समाजांना सोबत घेऊन पुढे जाणारे सरकार आहे. सर्व समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सतत कार्यरत असतो.
मुख्यमंत्री कार्यकाळात राज्यात वेगळा ओबीसी विभाग सुरु केला. या विभागाच्या माध्यमातून अनेक समाजहिताचे निर्णय घेतले. याच निर्णयाचा भाग म्हणून आज मुला-मुलींच्या 44 शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण केले. याशिवाय ‘महाज्योती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग सुरु केल्याने 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या पदांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत झाली आहे. यावेळी आ. मोहन मते, आ. कृष्णाजी खोपडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.